चालक-वाहकांची मनमानी
By Admin | Updated: July 24, 2016 22:07 IST2016-07-24T22:05:44+5:302016-07-24T22:07:54+5:30
चालक-वाहकांची मनमानी

चालक-वाहकांची मनमानी
दिंडोरी : बसमध्ये प्रवेश नाकारणाऱ्यांविरूद्ध निवेदन दिंडोरी : दिंडोरी तालुक्यासह अनेक ठिकाणी बससेवेचा शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना लाभ मिळत नसून, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे़
दिंडोरीपासून नाशिकपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. बहुतांशी विद्यार्थी बसने प्रवास करतात. मात्र काही वाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश न देता मार्गक्रमण करतात. यामुळे विद्यार्थ्यांनी महामंडळाकडून काढलेल्या मासिक पासचा उपयोग होत नाही. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी व परत येण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात पैसा व वेळेचा अपव्यय होत आहे. तरी विद्यार्थ्यांना न्याय देऊन दिंडोरी नाशिक बससेवा तसेच दिंडोरी-ठेपणपाडा-ननाशी अशी चक्री बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. (वार्ताहर)