शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी एकाच घराचा पत्ता देऊन दोन पालकांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:35 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळेच्या एक किलोमीटर परीसरातील विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील सिडको भागातील नामांकित शाळांच्या एक   किलोमीटरच्या परिघातील घरांना मागणी वाढली असून अनेक पालाकांकडून या भागातील घरे भाडे कराराने घेण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे अनेक पालकांनी या भागातील एकाच घराचे पत्ते त्यांच्या पाल्यांचे अर्ज दाखल करताना सादर केल्याचाही प्रकार समोर आला आहे.शिक्षण विभागाने लॉटरी लागल्यानंतर रहिवासाचा पुरावा सादर करण्याची संधी दिल्यामुळे पालक अशा प्रकारे आरटीई नियमातील त्रूटींचा गैरफायदा घेत असून त्यामुळे संबधित भाागातील संभावित लाभार्थी मात्र आरटीई प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देआरटीई प्रक्रियेतील उणीवांचा पालकांकडून गैरफायदाएकाच घरचा पत्ता देऊन दोन पालकांनी दाखल केले अर्ज यापूर्वी एकाच विद्यार्थ्यांचे दोन अर्ज दाखल झाल्याचे उघड

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळेच्या एक किलोमीटर परीसरातील विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील सिडको भागातील नामांकित शाळांच्या एक   किलोमीटरच्या परिघातील घरांना मागणी वाढली असून अनेक पालाकांकडून या भागातील घरे भाडे कराराने घेण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे अनेक पालकांनी या भागातील एकाच घराचे पत्ते त्यांच्या पाल्यांचे अर्ज दाखल करताना सादर केल्याचाही प्रकार समोर आला आहे.शिक्षण विभागाने लॉटरी लागल्यानंतर रहिवासाचा पुरावा सादर करण्याची संधी दिल्यामुळे पालक अशा प्रकारे आरटीई नियमातील त्रूटींचा गैरफायदा घेत असून त्यामुळे संबधित भाागातील संभावित लाभार्थी मात्र आरटीई प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडको आणि पाथर्डी फाटा परिसराला लागून असलेल्या सिम्बॉसिस शाळेत आरटीई अंतर्गत ३० जागांवर पूर्व प्राथमिक म्हणजेच नर्सरीसाठी प्रवेश दिले जातात. त्यामुळे या भागातील हजारो पालक आॅनलाईन अर्ज करतात. परंतु आॅनलाईन अर्ज करताना १ किलोमीटरच्या बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणे दुरापास्त  झाले आहे. कारण शहरातील विविध भागात राहणारे नागरिक या भागात केवळ मुलाला आटीईअंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी घर भाडे कराराने घेतात अथवा भाडे कराराचा करार करतात. यात अनेक गैरप्रकार समोर येत असून या भागातील एकाच घराचा पत्ता दोन पालकांनी अर्ज भरताना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यात अर्जक्रमाक १९एनएच ०२०५९७ व १९एनएच०२४६२५ अर्जक्रमांकांमध्ये एन ३३, एल ६०२४, सह्याद्रीनगर सिडको नाशिक हा एकच पत्ता देण्यात आला असून रेखांश आणि अक्षांशानुसार (लॉगीट्यूड आणि लॅटीट्यूड) येणारे अंतरही सारखेच आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अर्जदारांना आॅनलाईन लॉटरी प्रक्रियेत प्रवेशाची संधी मिळासी असल्याने लॉटरी प्रक्रियेविषयी सांशकता व्यक्त होऊ लागली आहे. 

आरटीई प्रक्रीयेतील त्रुटींचा गैरफायदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत आॅनलाईन लॉटरीची यंत्रणा असली तरी एकाच विद्यार्थ्यांचे दोन अर्ज शोधण्याची आणि एकाच पत्त्यावरील दोन अर्ज शोधण्याची यंत्रणा विकसित नाही. यापूर्वी एकाच विद्यार्थ्यांच्या जन्मतारखा बदलून दोन अर्ज दाखल के ल्याचे समोर आल्यानंतर आता एकाच पत्त्याचा वापर करून दोन वेगवेळ््या विद्यार्थ्यांनी आरटीईसाठी अर्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यामुळे आरटीईच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असून आरटीईचे खरे लाभार्थी मात्र शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राण्याची भिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळा