जलवाहिनीस गळती; पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 01:00 IST2021-05-04T23:46:06+5:302021-05-05T01:00:22+5:30
विंचूर : विंचूरला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीस गाजरवाडी येथे गळती लागल्याने विंचूरचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जलवाहिनीस गळती; पाणीपुरवठा ठप्प
ठळक मुद्देगाजरवाडी दिंडोरी येथे पाईपलाईन मोठ्या प्रमाणावर फुटलेली आहे.
विंचूर : विंचूरला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीस गाजरवाडी येथे गळती लागल्याने विंचूरचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
गाजरवाडी दिंडोरी येथे पाईपलाईन मोठ्या प्रमाणावर फुटलेली आहे. सोळा गांव पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नदीतून गेलेली आहे. नदीत असलेले पाईप हे पूणर्पणे जीर्ण झाले असून त्यातील काही पाईप बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सुमारे पाच ते सहा दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ग्रामपालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.