नाशिक : दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचे औचित्य साधून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट्स असोसिएशनच्या वतीने ‘कुंभदर्पण’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकार अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत कुंभमेळ्याची छायाचित्रे स्पर्धेसाठी सादर करता येतील. त्यासंदर्भातील प्रवेशिकांचे वितरण १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान होणार आहे, तर ३० आॅक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यालय, ४८, विजयकिरण अपार्टमेंट, चांडक- मायको सर्कल रस्ता, तिडके कॉलनी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘कुंभदर्पण’ छायाचित्र स्पर्धा
By admin | Updated: August 25, 2015 23:47 IST