सोशल मीडियावर ‘एप्रिलफूल’
By Admin | Updated: April 2, 2017 01:18 IST2017-04-02T01:18:41+5:302017-04-02T01:18:54+5:30
नाशिक : एकमेकांना फसवून, खोट्या संकल्पना लढवून एकापेक्षा एक भन्नाट प्रयोगांचा खेळ खेळत तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना मूर्ख बनवत ‘एप्रिलफूल’ची मजा लुटली

सोशल मीडियावर ‘एप्रिलफूल’
नाशिक : एकमेकांना फसवून, खोट्या संकल्पना लढवून एकापेक्षा एक भन्नाट प्रयोगांचा खेळ खेळत तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना मूर्ख बनवत ‘एप्रिलफूल’ची मजा लुटली. यासाठी सोशल मीडियाचा तरुणाईकडून चांगलाच वापर करण्यात आला.
एप्रिल महिन्याच्या एक तारखेला ‘एप्रिलफूल’ हे समीकरण फ्रान्स व युरोपमध्ये तयार झाले. अर्थात या समीकरणामागे वेगवेगळा इतिहासही सांगितला जातो आणि संदर्भही दिले जातात. फ्रान्सने ग्रेगरियन नावाची दिनदर्शिका नाकारल्याने युरोपवासीयांनी त्यांना मूर्ख म्हणून चिडविले, हा त्या संदर्भांपैकी एक संदर्भ. एकूणच मूर्ख बनविण्याची प्रथा दरवर्षी एप्रिलच्या एक तारखेला रूढ झाली आणि जगभर पसरली. या प्रथेच्या आधारे शनिवारी शहरातील तरुणाइने आपल्या मित्र-मैत्रिणींना मूर्ख बनविण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. यासाठी तरुणाइने व्हॉट्स अॅप, फेसबुक यांसारख्या सोशल साइट्सचा वापर केला. या साइट्सवर एकापेक्षा एक भन्नाट कल्पनेतून तरुणाईने ‘एप्रिलफूल’ केले. यामुळे अनेकांना मनस्ताप तर झालाच मात्र त्यातून त्याला कारणीभूत असलेल्या तरुण, तरुणींनी आनंद शोधला हे विशेष.
एकूणच श्निवार हा एप्रिलफूल राहिला. बॉलिवूडलाही ‘एप्रिलफूल’चा मोह आवरता आलेला नाही. १९६४ साली ‘एप्रिलफूल’ नावाचा चित्रपटच प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात असलेले ‘एप्रिलफूल बनाया, तो उनको गुस्सा आया, इसमे मेरा क्या कसुर...’ असे मजेशीर गाणेही त्या काळी चांगलेच गाजले आहे. या गाण्याचीदेखील आज अनेकांनी आपल्या मित्र-परिवाराला आठवण करून देण्यासाठी गीताची ध्वनिफीतही व्हायरल केली. तसेच काहींनी तर खास एक एप्रिलच्या औचित्यावर या गीताची कॉलर ट्यूनच कंपनीकडून ‘सेट’ करून घेतली होती.