सोशल मिडियावर ‘एप्रिल फूल’

By Admin | Updated: April 1, 2017 22:03 IST2017-04-01T22:03:05+5:302017-04-01T22:03:05+5:30

एकमेकांना फसवून, खोट्या संकल्पना लढवून एकापेक्षा एक सर्रास प्रयोगांचा खेळ खेळत तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना मुर्ख बनवत ‘एप्रिल फूल’ची मजा लुटली.

'April Fool' on Social Media | सोशल मिडियावर ‘एप्रिल फूल’

सोशल मिडियावर ‘एप्रिल फूल’

नाशिक : एकमेकांना फसवून, खोट्या संकल्पना लढवून एकापेक्षा एक सर्रास प्रयोगांचा खेळ खेळत तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना मुर्ख बनवत ‘एप्रिल फूल’ची मजा लुटली. यासाठी सोशल मिडियाचा तरुणाईकडून चांगलाच वापर करण्यात आला.
एप्रिल महिन्याच्या एक तारखेला ‘एप्रिल फूल’ हे समिकरण फ्र ान्स व युरोपमध्ये तयार झाले. अर्थात या समिकरणामागे वेगवेगळा इतिहासही सांगितला जातो आणि संदर्भही दिले जातात. फ्रान्सने ग्रेगरियन नावाची दिनदर्शिका नाकारल्याने युरोपवासियांनी त्यांना मुर्ख म्हणून चिडविले हा त्या संदर्भांपैकी एक संदर्भ. एकूणच मुर्ख बनविण्याची प्रथा दरवर्षी एप्रिलच्या एक तारखेला रु ढ झाली आणि जगभर पसरली. या प्रथेच्या आधारे शनिवारी शहरातील तरुणाइने आपल्या मित्र-मैत्रिणींना मुर्ख बनविण्याच्या संधीचा पुरेपुर फायदा घेतला. यासाठी तरुणाइने व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल साइट्सचा वापर केला. या साइट्सवर एकापेक्षा एक भन्नाट कल्पनेतून तरुणाईने ‘एप्रिल फूल’ केले. यामुळे अनेकांना मनस्ताप तर झालाच मात्र त्या मनस्तापातून त्याला कारणीभूत असलेल्या तरुण, तरुणींनी आनंद शोधला हे विशेष.
एकूणच श्निवार हा एप्रिल फूल राहिला. बॉलिवूडलाही ‘एप्रिल फूल’चा मोह आवरता आलेला नाही. १९६४ साली ‘एप्रिल फूल’ नावाचा चित्रपटच प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात असलेले ‘एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया, इसमे मेरा क्या कसुर...’ असे मजेशीर गाणेही त्या काळी चांगलेच गाजले आहे. या गीताचीदेखील आज अनेकांनी आपल्या मित्र-परिवाराला आठवण करुन देण्यासाठी गीताची ध्वनिफितही व्हायरल केली. तसेच काहींनी तर खास एक एप्रिलच्या औचित्यावर या गीताची कॉलर ट्यूनच कंपनीकडून ‘सेट’ करुन घेतली होती.

Web Title: 'April Fool' on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.