जनसुविधा योजनेअंतर्गत देवळा तालुक्यातील कामांना मंजुरी

By Admin | Updated: August 8, 2014 01:05 IST2014-08-08T00:48:53+5:302014-08-08T01:05:31+5:30

जनसुविधा योजनेअंतर्गत देवळा तालुक्यातील कामांना मंजुरी

Approval of works in Deola taluka under Janshundi Yojana | जनसुविधा योजनेअंतर्गत देवळा तालुक्यातील कामांना मंजुरी

जनसुविधा योजनेअंतर्गत देवळा तालुक्यातील कामांना मंजुरी

 

देवळा : जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-१५ अंतर्गत जनसुविधा योजनेअंतर्गत देवळा तालुक्यासाठी ७७ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यात वासोळापाडा (फुलेनगर) येथे ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
देवळा तालुक्यातील मंजूर व निधीची तरतूद असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमीची सुधारणा करणे या कामांसाठी स्थानिक नागरिकांनी मागणी केल्यानंतर त्याची दखल घेऊन या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामपंचायतीला अद्यावत कार्यालयीन इमारत मिळणार आहे.
तसेच स्मशानभूमीच्या विकासकामांमुळे अंत्यसंस्काराच्या निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत सन २०१४-१५ या वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर विकासकामे पुढीलप्रमाणे- स्मशानभूमी बैठक व्यवस्था (५ लाख रुपये), डोंगरगाव येथे स्मशानभूमी सुविधा करणे (५ लाख रुपये), निंबोळा, खालप, वडाळा, वाजगाव, भऊर, सावकी, तिसगाव, शेरी, भऊर (आदिवासी वस्ती), वार्शी या गावात स्मशानभूमी दहन शेड बांधण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
तसेच लोहोणेर येथे मुस्लीम दफनभूमी सुविधा करणे. या कामासाठी पाच लाख रुपयांना मंजुरी मिळाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Approval of works in Deola taluka under Janshundi Yojana