शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

सोमपूर-जायखेडा बंधाऱ्याच्या बंदिस्त पाइपलाइनच्या कामाला मंजुरी

By श्याम बागुल | Updated: September 27, 2018 15:22 IST

येत्या दोन वर्षांत सदरचे काम पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले असून, त्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आह. हरणबारी धरणातून मोसम नदीत सुटणारे पाणी बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे अडविण्यासाठी ब्रिटिश कालीन बंधारा आहे.

ठळक मुद्देजलसंपदाचा निर्णय : ४२ लाखांच्या कामाला प्रशासकीय मान्यताजायखेडा बंधारा २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे तुटला होता.

नाशिक : हरणबारी धरणातून मोसम नदीवर बांधण्यात आलेल्या सोमपूर गावाजवळील ब्रिटिश कालीन बंधारा ते जायखेडा बंधाºयापर्यंत कालव्याची झालेली दुरवस्था व वाया जाणा-या पाण्याचा विचार करता सोमपूर ते जायखेडा यादरम्यान कालव्यातून बंदिस्त पाइपलाइन टाकण्यास राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली असून, त्यासाठी ४२ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.येत्या दोन वर्षांत सदरचे काम पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले असून, त्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आह. हरणबारी धरणातून मोसम नदीत सुटणारे पाणी बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे अडविण्यासाठी ब्रिटिश कालीन बंधारा आहे. या बंधाºयापासून जायखेडा गावापर्यंत सहा किलोमीटर कालवा असून, या कालव्याच्या पाण्यावर जायखेडा शिवारातील १४० हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. जायखेडा बंधारा २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे तुटला होता. त्याचे काम पाच वर्षांनंतर पूर्ण झाले. त्यानंतर जायखेडा कालव्यातून सिंचनासाठी नियमित पाणी दिले जात असले तरी, सोमपूर गावाजवळ या कालव्याच्या उजव्या बाजूस असलेल्या उंचीमुळे पावसाळ्यात गावाचे सांडपाणी व वाहून येणारा गाळ थेट कालव्यात जमा होत असल्यामुळे कालवा गाळाने भरत आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी वाहून नेण्याची क्षमता घटून पाण्याच्या वहनातही अडचणी निर्माण होत असल्याची बाब वेळोवेळी पाटबंधारे खात्याच्या निदर्शनास गावकºयांनी आणून दिली होती. त्यामुळे कालव्यातच बंदिस्त पाइपलाइन टाकून कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या कामासाठी एकूण ४२ लाख ५१ हजार ८७५ रुपये खर्च येणार असून, जलसंपदा विभागाने खर्चास मान्यता देण्याबरोबरच कामाला प्रशासकीय मंजुरीचे आदेश काढले आहेत.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पNashikनाशिक