अंबोलीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:56 IST2018-11-27T18:56:15+5:302018-11-27T18:56:28+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर मधील अंबोली ग्रामपंचायतचे उपसरपंच तानाजी कड यांच्या वर अविश्वास ठराव पारीत केला आहे.

अंबोलीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर मधील अंबोली ग्रामपंचायतचे उपसरपंच तानाजी कड यांच्या वर अविश्वास ठराव पारीत केला आहे.
सुरवाती पासून अंबोली येथील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरली होती, त्यातून उपसरपंचपदासाठी अनेकांनी दावेदारी स्पष्ट केली असताना, त्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढतीत तानाजी कड यांची सरशी झाली होती, परंतु अंबोली येथील सदस्यांनी २० नोव्हेंबर रोजी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांना उपसरपंच पदाबाबत अविश्वास ठराव पारित करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर (दि. २६) तहसीलदार महेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत तहसीलदार यांनी सर्व सदस्यांना संपूर्ण माहिती दिली. व आपापली मते मांडण्यास सांगितले. प्रत्येक सदस्यांनी मत मांडून झाल्यानंतर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. नऊ सदस्यांपैकी ८-१ अश्या फरकाने अविश्वास ठराव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदी नुसार मंजूर करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली.
सुरवातीपासून चुरशी ठरलेल्या अंबोली ग्रामपंचायत निवडणूकीत आता उपसरपंच म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळते.