येवल्यात २९ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी
By Admin | Updated: March 2, 2017 01:03 IST2017-03-02T01:02:51+5:302017-03-02T01:03:47+5:30
येवला : येथील नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या २८ कोटी ८३ लाख ४७ हजार ७६ रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगर परिषदेच्या विशेष सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.

येवल्यात २९ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी
येवला : येथील नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या २८ कोटी ८३ लाख ४७ हजार ७६ रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगर परिषदेच्या विशेष सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. २१ लाख ९९ हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक असून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. एलईडी पथदीप साहित्य व पथदीप खांब खरेदीसाठी ४० लाख, गटार बांधकाम व दुरुस्तीसाठी २० लाख, जंतुनाशके खरेदीसाठी २० लाख, पाणीपुरवठा देखभाल व दुरु स्ती ३५ लाख, नवीन क्लोरीनेटर खरेदीसाठी ५ लाख, जलशुद्धीकरणासाठी १५ लाख रु पये यांच्यासह महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर होते. सभेच्या कामकाजाला सुरु वात करण्यापूर्वी दिवंगत पंचमसिंग परदेशी, हरिभाऊ क्षीरसागर, दत्तात्रय मोरे यांच्यासह दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी विशेष सभेमध्ये अंदाजपत्रकाबाबत माहिती दिली. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे निरसन केले. लेखापाल सुभाष निकम, राजेश दाणेज, बंडू खानापुरे यांनी अंदाजपत्रक तयार केले असून, त्याचे सभागृहात वाचन करण्यात आले. यावेळी
सभेला एकूण २४ सदस्यांसह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)