तीन विषय समित्या गठित करण्यास मंजुरी

By Admin | Updated: April 16, 2017 00:53 IST2017-04-16T00:53:19+5:302017-04-16T00:53:31+5:30

महासभा : सहाच प्रभाग समित्यांवर शिक्कामोर्तब

Approval to constitute three Sub-committees | तीन विषय समित्या गठित करण्यास मंजुरी

तीन विषय समित्या गठित करण्यास मंजुरी

नाशिक : लोकसंख्येच्या प्रमाणात सहा ऐवजी नऊ प्रभाग समित्या स्थापन करण्यास एकमेव राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतील समाविष्ट एक अपक्ष नगरसेवक वगळता अन्य सर्वांनी विरोध दर्शविला. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या सहा प्रभाग समित्या ‘जैसे थे’ ठेवतानाच कामकाजाच्या सोईसाठी विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या नव्याने तीन विषय समित्या गठित करण्यास महासभेने मंजुरी दिली.
महापालिकेच्या महासभेवर प्रशासनाने सहा ऐवजी नऊ प्रभाग समित्यांची रचना करणे कायद्याने आवश्यक असल्याचा प्रस्ताव ठेवतानाच अपुरे मनुष्यबळाचेही कारण पुढे केले होते. यावेळी प्रस्तावावर चर्चा करताना शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी कार्यालयांची संख्या वाढविण्यापेक्षा कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले आणि तीन नवीन विषय समित्याही गठित करण्याची उपसूचना दिली. मात्र, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी विषय समित्यांच्या स्थापनेवर आक्षेप घेत प्रभाग समित्यांची संख्या नऊ करण्याची सूचना केली. अपक्ष गुरुमित बग्गा यांनीही शेलार यांच्या सुरात सूर मिसळवत लोकसंख्येनुसार १० प्रभाग समित्या स्थापन करण्याची मागणी केली. साधनसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याचेही बग्गा यांनी सांगितले. उद्धव निमसे यांनी जेव्हा नोकरभरती होईल त्यावेळी

Web Title: Approval to constitute three Sub-committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.