न्यायडोंगरीच्या ग्रामसभेत कृती आराखड्यास मंजुरी
By Admin | Updated: July 28, 2016 00:42 IST2016-07-28T00:31:45+5:302016-07-28T00:42:23+5:30
न्यायडोंगरीच्या ग्रामसभेत कृती आराखड्यास मंजुरी

न्यायडोंगरीच्या ग्रामसभेत कृती आराखड्यास मंजुरी
न्यायडोंगरी : आमचं गाव आमचा विकास या योजनेअंतर्गत न्यायडोंगरी ग्रामपालिकेची ग्रामसभा सरपंच गायत्री मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांवर चर्चा करण्यात येऊन कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
गेल्या तीन दिवसांपासून आमचं गाव आमचा विकास या योजनेची कार्यशाळा सुरू होती. दरम्यान, पहिल्याच दिवशी प्रभारी अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी गैरहजर राहिल्याने या कार्यशाळेचा फज्जा उडाला होता. परंतु ग्रामस्थांनी सदर कार्यशाळा तहकूब करण्यात येऊन एकदिवसीय वेतन कपातीचा दणका दिला. सरपंच गायत्री मोरे यांनी गैरहजर अधिकारी यांची चांगलीच कानउघडणी केली. सायंकाळी मशालफेरी काढण्यात आली. तिसऱ्या दिवशी संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढत जनजागृती करीत गाव स्वच्छ, झाडे लावा झाडे जगवा याशिवाय विविध आरोग्यविषयी घोषणा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपालिकेने प्रत्येक विद्यार्थ्यास एक रोपटे देऊन गौरविण्यात आले. या कार्यशाळेचा समारोप ग्रामसभा घेऊन करण्यात आला. या सभेत कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली. ग्रामसेवक शरद मोहिते यांनी आभार मानले. (वार्ताहर )