अ‍ॅपेरिक्षाची दुचाकीला धडक

By Admin | Updated: February 3, 2016 23:04 IST2016-02-03T23:01:13+5:302016-02-03T23:04:58+5:30

अ‍ॅपेरिक्षाची दुचाकीला धडक

Appreciate bicycle hit | अ‍ॅपेरिक्षाची दुचाकीला धडक

अ‍ॅपेरिक्षाची दुचाकीला धडक

मालेगाव : कुसुंबा रस्त्यावरील वडगाव शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाने धडक दिल्याने भाऊलाल रामा डोमाले, रा. मोहपाडाशिवार, हा गंभीर जखमी झाला. बुधवारी (दि.३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
तानाजी रामा ठोंबरे (४०, रा. मोहपाडाशिवार) यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांत फिर्याद दिली. अ‍ॅपेरिक्षा (क्रमांक ७२२५)च्या चालकाने करंजगव्हाणकडून मालेगावकडे भरधाव वेगात रिक्षा चालवून समोरून येणारी दुचाकी (क्रमांक ९५३२)ला धडक दिली. यात दुचाकीस्वार भाऊलाल डोमाले हा युवक गंभीर जखमी झाला. खबर न देता पळून गेला म्हणून अ‍ॅपेरिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.

Web Title: Appreciate bicycle hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.