दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:55 IST2020-02-13T23:29:46+5:302020-02-14T00:55:48+5:30

महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत महापालिकेत विवेक धांडे आणि स्वप्नील मुधलवाढकर या दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील धांडे यांच्याकडे पंचवटीच्या विभागीय अधिकारी पदाचा आणि मुधलवाढकर यांच्याकडे नाशिक पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे आणि त्यामुळे आर. एस. पाटील व धारणकर या अभियंत्यांची सुटका झाली आहे.

Appointment of two Assistant Commissioners | दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती

दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती

ठळक मुद्देशासनाचे आदेश : धांडे, मुधलवाढकर यांच्याकडे कार्यभार

नाशिक : महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत महापालिकेत विवेक धांडे आणि स्वप्नील मुधलवाढकर या दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील धांडे यांच्याकडे पंचवटीच्या विभागीय अधिकारी पदाचा आणि मुधलवाढकर यांच्याकडे नाशिक पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे आणि त्यामुळे आर. एस. पाटील व धारणकर या अभियंत्यांची सुटका झाली आहे.
महापालिकेत अनेक पदे रिक्त असून, सध्या सेवेत असलेले अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहे. शिवाय स्वेच्छानिवृत्तीचे प्रमाणदेखील वाढले आहे. तथापि, शासनाकडून आकृतिबंध मंजूर होत नसल्याने कामकाजात व्यत्यय येत आहे. त्यामुळे प्रशासनाने अभियंत्यांकडे विभागीय अधिकारी आणि तत्सम प्रशासकीय कामकाजांच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. अतिरिक्त कामाच्या ताणामुळे अभियंते वैतागले होते तर मध्यंतरी एका अभियंत्याचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे कामाच्या ताणाची चर्चा होत होती.
आकृतिबंध मंजूर होत नसेल तर किमान शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांकडून सातत्याने होत होती. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या तब्बल ७४ उमेदवारांना राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये सहायक आयुक्तपदावर नियुक्त्या दिल्या आहेत. त्याअंतर्गत नाशिक महापालिकेत विवेक धांडे आणि स्वप्नील मुधलवाढकर यांची सहा महिन्यांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. दोघेही अधिकारी
बुधवारी (दि.१२) महापालिकेत रुजू झाले आहेत.

दोन्ही विभागांच्या कार्यभारापासून सुटका
प्रशासनाने धांडे यांची पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारीपदी, तर मुधलवाढकर यांची नाशिक पूर्वचे विभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असल्यामुळे दोन्ही विभागांचा अतिरिक्त कार्यभार असणाºया अभियंत्यांची सुटका झाली आहे.

Web Title: Appointment of two Assistant Commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.