शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:29 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च-२०२० मध्ये घेण्यात येणारी बारावी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या महिनाभराच्या कालावधी  होणार आहे. या पार्श्वभूमीवर तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरीय मंडळातर्फे दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री पर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे.

ठळक मुद्दे १८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षातणावमुक्त परीक्षांसाठी समुपदेशक नियुक्त

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च-२०२० मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या महिनाभराच्या कालावधी  होणार आहे. या पार्श्वभूमीवर तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरीय मंडळातर्फे दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री पर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे.  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी)ची लेखी परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी तसेच आॅनलाइन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. हे सर्व समुपदेशक सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. परंतु, विद्यार्थी अथवा पालकांनी परीक्षा कें द्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील प्रश्न समुपदेशकांना विचारू नये, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षा