साईनाथनगर चौकात पोलीस नियुक्त
By Admin | Updated: November 24, 2015 23:55 IST2015-11-24T23:54:53+5:302015-11-24T23:55:23+5:30
साईनाथनगर चौकात पोलीस नियुक्त

साईनाथनगर चौकात पोलीस नियुक्त
इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीवरील सिग्नल यंत्रणा काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्यात आली. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांअभावी नियमांची पायमल्ली होत आहे. या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
साईनाथनगर चौफुलीवर चार मुख्य रस्ते एकत्र येतात. यामध्ये मुंबई महामार्ग, पुणे महामार्ग, वडाळा नाका- साईनाथनगर चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. प्रत्येकास ये-जा करण्याची घाई त्यामुळे लहान-मोठे अपघात घडतात. नागरिकांच्या मागणीनुसार सिग्नल यंत्रणा मंजूर झाली होती. सुमारे सात महिने यंत्रणेचे साहित्य धूळ खात पडून होते. काही दिवसांपूर्वीच सिग्नल यंत्रणा बसविण्यात येऊन सुरू करण्यात आली. परंतु पोलीस कर्मचाऱ्याअभावी वाहनधारक सिग्नल पाळत नव्हते. (वार्ताहर)