तांत्रिक व अभियंता दर्जाचे अधिकारी नियुक्त करावे,
By Admin | Updated: November 11, 2014 01:03 IST2014-11-11T01:03:04+5:302014-11-11T01:03:37+5:30
तांत्रिक व अभियंता दर्जाचे अधिकारी नियुक्त करावे,

तांत्रिक व अभियंता दर्जाचे अधिकारी नियुक्त करावे,
नाशिक : महापालिकेसमोर आव्हान असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांसाठी तातडीने तांत्रिक व अभियंता दर्जाचे अधिकारी नियुक्त करावे, अशी सूचना पालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण गेडाम यांनी संबंधित खातेप्रमुखांना दिल्या आहेत.पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या दालनात सर्वप्रथम कुंभमेळ्याशी संबंधित खातेप्रमुखांची बैठक झाली. यावेळी स्लाईड शोद्वारे खातेप्रमुखांनी आराखड्यातील नियोजित कामे आणि सुरू असलेली कामे याची माहिती दिली. या बैठकीत आढावा घेतल्यानंतर आयुक्त गेडाम यांनी अधिकाऱ्यांसह तपोवनातील नियोजित साधुग्रामच्या कामांची पाहणी केली. तपोवनात ५४ एकर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. त्यानुसार तेथे सुरू असलेल्या कामांची तसेच प्रारूपांची माहिती गेडाम यांनी घेतली. साधुग्रामच्या कामाची व्यापकता आणि गती याचा विचार करून मनपाचे तांत्रिक अधिकारी आणि अभियंता याठिकाणी वाढविण्याच्या सूचना केल्या. रामसृष्टीची पाहणीदेखील त्यांनी केली. यावेळी विविध कामांची माहिती अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता गौतम पगारे, योगेश कमोद आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)