सातपुरला विभागीय अधिकारी नियुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:24+5:302021-02-13T04:15:24+5:30
सातपूर विभागात अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्यासाठी प्रमुख अधिकारी नाहीत. शिवाय विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्याने त्यांना समस्या ...

सातपुरला विभागीय अधिकारी नियुक्त करा
सातपूर विभागात अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्यासाठी प्रमुख अधिकारी नाहीत. शिवाय विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्याने त्यांना समस्या सोडविण्यास अपयश येत आहे. जन्म-मृत्यू दाखला असो की विवाह नोंदणी,घरपट्टी, पाणीपट्टी विविध कर आदींच्या वसुलीवर परिणाम होत आहे. सद्य:स्थितीत सातपूर विभागाचा पदभार अतिरिक्त आयुक्त नितीन नेर यांच्याकडे तात्पुरता आहे. त्यांना दोन्ही पदभार सांभाळतांना सातपूर विभागाकडे साहजिकच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एकच जबाबदारी द्यावी. आणि सातपूरला पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे विजय अहिरे, नाना आव्हाड, बलराम रावल, समीर रेड्डी, जगदीश पगारे, कृष्णा भालेराव, सुनील मौले, प्रवीण भवर, ज्ञानेश्वर आव्हाड, अक्षय बेंडकुळे, जितू साळवे, दीपक काकवीपुरे, भारत भालेराव, भगवान पवार, किशोर सोनवणे,अंबादास कापसे आदींनी केली आहे.
(फोटो १२ सातपूर) पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याच्या मागणीचे निवेदन देतांना विजय अहिरे, भारत भालेराव, नाना आव्हाड, बलराम रावल, सुनील मौले, प्रवीण भवर, ज्ञानेश्वर आव्हाड, दीपक काकवीपुरे आदी.