पिंगळे, धोंगडे, मानकर, अरिंगळे, यांचे अर्ज
By Admin | Updated: September 27, 2014 01:05 IST2014-09-27T01:04:17+5:302014-09-27T01:05:34+5:30
पूर्व विधानसभा : भुजबळांची हजेरी

पिंगळे, धोंगडे, मानकर, अरिंगळे, यांचे अर्ज
नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बसपा, डावी लोकशाही समिती यांच्यासह अपक्ष अशा एकूण सहा जणांनी अर्ज दाखल
केले.
पूर्वमधून माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी पेठफाटा येथून रॅलीने समर्थकांसह शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. ही रॅली पेठरोड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, अर्जुन टिळे, छबू नागरे, विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, दिलीप खैरे, शिवाजी चुंबळे, दिलीप थेटे, गोकुळ पिंगळे, कविता कर्डक आदिंनी देवीदास पिंगळे यांचा उमेदवारी अर्ज भरला.
निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी बाबा सदाफुले, अविनाश अरिंगळे, दिनकर आढाव आदि उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश करणारे अपक्ष नगरसेवक दामोदर मानकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मानकर यांच्यासमवेत यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक संजय चव्हाण आदि उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरसेवक रमेश धोेंगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती अॅड. राहुल ढिकले, अनंत सूर्यवंशी, गुलजार कोकणी आदि उपस्थित होते.
बहुजन समाज पक्षाकडून शहराध्यक्ष मुकुंद गांगुर्डे यांनी समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच डावी लोकशाही समितीच्या वतीने विजय बागुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी उपमहापौर अॅड. मनीष बस्ते, श्रीधर देशपांडे, राजू देसले, डॉ. गिरीश मोहिते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)