संगणक प्रशिक्षणासाठी दृष्टिबाधितांना आवाहन

By Admin | Updated: July 19, 2014 21:19 IST2014-07-18T01:00:05+5:302014-07-19T21:19:02+5:30

संगणक प्रशिक्षणासाठी दृष्टिबाधितांना आवाहन

Appeal to the Visually Challenged for Computer Training | संगणक प्रशिक्षणासाठी दृष्टिबाधितांना आवाहन

संगणक प्रशिक्षणासाठी दृष्टिबाधितांना आवाहन

 

नाशिक : नॅब महाराष्ट्रच्या वतीने सातपूर येथे दृष्टिबाधितांना संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी अद्ययावत संगणक लॅब सुरू करण्यात आली असून, पुणे येथील महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनने नॅब महाराष्ट्रला एमएससीआयटीचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने केंद्रासाठी मान्यता दिली आहे. यासाठी राज्यातील सर्व दृष्टिबाधितांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी येत्या २० जुलैपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी नॅबच्या संगणक विभागातील वैशाली लहरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर, प्रकल्प संचालक मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to the Visually Challenged for Computer Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.