लसीकरण करण्याचे आवाहन

By Admin | Updated: January 4, 2016 23:37 IST2016-01-04T23:21:52+5:302016-01-04T23:37:41+5:30

लसीकरण करण्याचे आवाहन

Appeal to vaccination | लसीकरण करण्याचे आवाहन

लसीकरण करण्याचे आवाहन


मालेगाव : केंद्र शासनाच्या मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाचा दुसरा टप्पा येत्या दि. ७ ते १४ जानेवारीला होत आहे. नागरिकांनी आपल्या ० ते २ वर्षांच्या ज्या बालकांचे कोणतेही लसीकरण राहिले असल्यास ते लसीकरण आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा आपल्या भागात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेशकुमार निकम यांनी केले आहे.
मालेगाव शहर व तालुक्यातील बालकांमधील आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि सद्यस्थितीत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आही की, अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात.
केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१५ मध्ये मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाचा दुसरा टप्पा हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करावयाचे आहे. मालेगाव तालुक्यात ७ ते १४ जानेवारी व ७ ते १४ फेब्रुवारी २०१६
या कालावधीमध्ये मिशन
इंद्रधनुष्य मोहिमेची फेरी राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.