चिंचवडच्या आश्रमशाळेची दुरवस्था ग्रामस्थांचे आदिवासी आयुक्तांना निवेदन

By Admin | Updated: June 21, 2014 01:15 IST2014-06-21T01:15:59+5:302014-06-21T01:15:59+5:30

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड या अनुदानित आश्रमशाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली

Appeal to the Tribal Commissioner of the residents of Chinchwad Ashramshal | चिंचवडच्या आश्रमशाळेची दुरवस्था ग्रामस्थांचे आदिवासी आयुक्तांना निवेदन

चिंचवडच्या आश्रमशाळेची दुरवस्था ग्रामस्थांचे आदिवासी आयुक्तांना निवेदन

  नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड या अनुदानित आश्रमशाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, शाळेत एकही विद्यार्थी शिक्षण घेण्यास तयार नाही. या शाळेच्या व्यवस्थापनाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी चिंचवडच्या ग्रामस्थांनी आदिवासी विकास आयुक्त डॉ. संंजीवकुमार यांच्याकडे केली आहे. आदिवासी सेवा समिती संचलित चिंंचवडच्या आश्रमशाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, या शाळेच्या पटावर ४०० विद्यार्थी दाखविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात १६ जून २०१४ पासून शाळा सुरू झाल्यानंतर प्राथमिक व माध्यमिक वर्गात एकही विद्यार्थी हजर झालेला नाही. या शाळेच्या भोजनाची आणि इतर देखभालीसाठी शासनाने स्वतंत्र अधीक्षक मोहिते म्हणून नियुक्त केले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे अधीक्षक शाळेवर आले नाहीत तरीही त्यांचे नियमित वेतन निघत आहे. निवासी आश्रमशाळा असल्याने रात्री-अपरात्री विद्यार्थ्यांचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदार कोणीही राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शाळेतील एकही शिक्षक मुख्यालयी थांबत नाही. प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी नेमलेल्या समन्वयकांची ग्रामस्थांशी बोलण्याची भाषा अरेरावीची असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे शाळेच्या दुरवस्थेसह अन्य बाबींची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन डॉ. संजीवकुमार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य इंदुमती खोसकर, चिंचवडचे उपसरपंच भगवान बेंडकोळी, काळू शिंदे, व्यंकट सहारे, सुकदेव दहावाड यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to the Tribal Commissioner of the residents of Chinchwad Ashramshal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.