स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना मनपाचे आवाहन
By Admin | Updated: September 12, 2015 22:55 IST2015-09-12T22:54:01+5:302015-09-12T22:55:53+5:30
स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना मनपाचे आवाहन

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना मनपाचे आवाहन
मालेगाव : शहरातील महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांना स्वाइन फ्लू आजार झाल्यास किंवा तशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर हाजी मो. इब्राहिम व मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात मनपाने शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. या आजारात ३ ते ५ दिवस सर्दी, साधा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, काही रोग्यांमध्ये तीव्र ताप, उलटी, जुलाब व श्वास फुलणे आदि लक्षणे आढळतात. ही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार करावेत तसेच सामान्य रुग्णालय, मनपाच्या वाडिया, अली अकबर या रुग्णालयांशी संपर्क साधावा व उपचार सुरू करून घ्यावेत. हा आजार गरोदर माता, स्तनदा माता, लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना लवकर होतो. मनपा हद्दीतील वैद्यकीय व्यावसायिकांनी वरील लक्षणे आढळताच टॅमिफ्लूचा औषधोपचार करावा तसेच रुग्णांना मनपाच्या रुग्णालयात पाठवावे, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.