‘मिशन : वन मिलीयन’ उपक्रमात नोंदणी करण्याचे आवाहन
By Admin | Updated: July 3, 2017 18:28 IST2017-07-03T18:28:45+5:302017-07-03T18:28:45+5:30
आगामी आॅक्टोबर महिन्यात भारतात प्रथमच १७ वर्षांआतील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मिशन : वन मिलीयन’ उपक्रमात नोंदणी करण्याचे आवाहन
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : आगामी आॅक्टोबर महिन्यात भारतात प्रथमच १७ वर्षांआतील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा प्रसार व प्रचार व्हावा तसेच फुटबॉल या क्रीडा प्रकाराला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार फुटबॉल खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी विशिष्ट संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘मिशन : वन मिलीयन’ या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातून जास्तीत जास्त नागरिकांनी शुभेच्छा द्याव्या यासाठी जास्तीत जास्त फॉर्म भरून देण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे लहान वयातील खेळाडूंमध्येही फुटबॉलबद्दल आवड निर्माण होणार आहे. भारतात होणाऱ्या ऐतिहासिक फुटबॉल स्पर्धेनिमित्त भारतीय संघाला आणि भारतीय खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे तसेच हे फॉर्म भरताना या खेळाबाबत नवीन योजना राबविण्याच्यादृष्टीने अनेक कल्पना सुचवता येणार आहेत.