व्यसनमुक्त जीवन जगण्याचे प्रदोष कार्यक्रमात आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:21 IST2019-04-18T17:20:52+5:302019-04-18T17:21:02+5:30
पिंपळगाव बसवंत : फेसबुक, व्हॉट्सअॅप व वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या तरु णांनी हातातील मोबाइलसह व्यसनमुक्तीकडे वळण्याची गरज असल्याचे मत हभप रामायणाचार्य भास्कर रसाळ महाराज यांनी व्यक्त केले.

व्यसनमुक्त जीवन जगण्याचे प्रदोष कार्यक्रमात आवाहन
पिंपळगाव बसवंत : फेसबुक, व्हॉट्सअॅप व वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या तरु णांनी हातातील मोबाइलसह व्यसनमुक्तीकडे वळण्याची गरज असल्याचे मत हभप रामायणाचार्य भास्कर रसाळ महाराज यांनी व्यक्त केले. पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथील शिवलिंग व जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मंदिराचा वर्धापनदिन व मासिक प्रदोष संपन्न झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.
अध्यात्म हे परिपूर्ण ज्ञान आहे, आत्मा-दैवी ज्ञान संबंधित आहे, विज्ञानाच्या साह्याने मानवाने प्रगती केली आहे; पण तितकेच नुकसानदेखील केले आहे, ग्रंथ पुराणे सोडून फेसबुक व्हॉट्सअॅप व मोबाइलवरील वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या मनुष्याला भगवद्गीता, पुराण यावर विश्वास राहिला नाही त्यामुळे दैवी ज्ञानाचा उपयोग आताच्या मानवाला होत नाही. विज्ञान सोडा व आध्यात्मिकाचे पाय धरा तेव्हाच आजचा तरु ण व्यसनमुक्त होईल, असे प्रतिपादन रामायणाचार्य भास्कर रसाळ आहेरगावकर महाराज यांनी केले. यावेळी रामराव डेरे, मनोज शेवरे, पुंडलिक मेधणे, ज्ञानेश्वर बनकर, नाना कुमावत, विजय जाधव, संजय विधाते, भाऊसाहेब खराटे, हनुमंत शेवरे, सचिन कायस्थ, कोंडाजी मोरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रामराव डेरे यांनी मनोगतात सांगितले की, मंदिर झाल्यापासून अनेक तरु ण जय बाबाजी भक्त मंडळाच्या सान्निध्यात आले व ते व्यसनमुक्त झाले. वेळोवेळी सामाजिक उपक्र म राबवून व्यसनात अडकलेल्या तरु णांना समाजाच्या योग्य प्रवाहात आणण्यासाठी मासिक प्रदोष कार्यक्र म घेतले जातात.
या कार्यक्र मात माजी सैनिक मुरलीधर विधाते यांनी अन्नदान केले. पुढील मासिक प्रदोषात बळी विधाते यांनी अन्नदान करणार असल्याचे सांगितले. बाबाजी भक्त परिवारातर्फेत्यांचे स्वागत व आभार मानण्यात आले.
यावेळी नवनाथ विधाते, विनोद विधाते, अमोल आंबेकर, गणेश पवार, अरु ण खोडे, जितू खोडे, ज्ञानेश्वर चव्हाण, लखन शिंदे, हरी शेवरे, श्रवण सोनवणे आदींसह पिंपळगाव परिसरातील भाविक उपस्थित होते.