नवमतदारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन
By Admin | Updated: July 3, 2017 00:15 IST2017-07-03T00:15:02+5:302017-07-03T00:15:23+5:30
देवळा : १८ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा व्यक्तींना नाव नोंदणी करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

नवमतदारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी ज्या व्यक्तींची वयाची १८ वर्ष पूर्ण झाली आहेत तसेच ज्यांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदवले नाही अशा व्यक्तींना आपले नाव नोंदणी करण्याची संधी दिनांक १ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत प्राप्त होणार असून नवमतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार कैलास पवार यांनी मतदार नोंदणी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी केले.
महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतेवेळीच मतदार नोंदणी अर्ज भरून घेतले जाणार असुन ज्या विद्यार्थ्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण होतील अशा विद्यार्थ्यांचे नाव आपोआपच मतदार यादीत समाविष्ट होणार आहे. यासाठी सर्व प्रकारचे नमुना अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत. याकरिता तालुक्यातील ९५ मतदान केंद्रावर नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच ३१ जुलै पर्यंत काही आक्षेप अगर दावा असेल तर दाखल करता येणार आहे. ८ व २२ जुलै रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पवार यांनी दिली. प्रास्ताविक आय आय शेख यांनी केले. यावेळी परदेशी, चंद्रकांत भोसले, ए. ए. ढूमशे, विजय अहीरे आदि उपस्थित होते.