नारायण सुर्वे पुरस्कारासाठी आवाहन

By Admin | Updated: May 16, 2014 00:27 IST2014-05-16T00:23:53+5:302014-05-16T00:27:22+5:30

नाशिक : येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठी कथासंग्रह, कवितासंग्रह आणि कादंबरी यासाठी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात. त्यासाठी वाचनालयाकडून १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या काळात प्रकाशित झालेले साहित्य मागविण्यात आले आहे. कथासंग्रहासाठी सुभाष चौधरी यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह; कवितासंग्रह व कादंबरीसाठी घरकामगार मोलकरीण संघटनेच्या वतीने ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी प्रकाशित साहित्याच्या दोन प्रती सचिव, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, सिंहस्थनगर, सिडको- ०९ या पत्त्यावर येत्या ३१ जुलैपर्यंत स्वत:चा परिचय व छायाचित्रासह पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Appeal for Narayana Survey Award | नारायण सुर्वे पुरस्कारासाठी आवाहन

Web Title: Appeal for Narayana Survey Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.