भारत बंदसाठी आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:16 IST2021-09-27T04:16:24+5:302021-09-27T04:16:24+5:30

नाशिक : देशभरातील नागरिकांना घातक ठरणारे शेतकरी विरोधी कायदे, वाढती पेट्रोल, डिझेल दरवाढ, कामगार विरोधी कायदे यांच्या विरोधात देशातील ...

Appeal for India Bandh | भारत बंदसाठी आवाहन

भारत बंदसाठी आवाहन

नाशिक : देशभरातील नागरिकांना घातक ठरणारे शेतकरी विरोधी कायदे, वाढती पेट्रोल, डिझेल दरवाढ, कामगार विरोधी कायदे यांच्या विरोधात देशातील ५०० पेक्षा अधिक शेतकरी संघटना, तसेच २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्यावतीने सोमवारी (दि. २७) संपूर्ण शहरात फिरुन भारत बंदचे आवाहन करण्यात येणार आहे. हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार शनिवारी काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत सर्व पक्ष आणि संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.भारत बंदबाबत सर्वपक्षीय बैठकीनंतर सोमवारी दुपारी १२ वाजता काँग्रेस कार्यालयात जमून बंदचे आवाहन करण्यात येणार आहे. या संदर्भात मुंबई येथे ३०० पेक्षा अधिक जनसंघटना सहभागी असलेली जनआंदोलन संघर्ष समितीची बैठक झाली असून महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी देखील २७ सप्टेंबरच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी ठरण्यासाठी सर्व संघटना आणि पदाधिकारी रविवारपासूनच सक्रिय झाले आहेत.

Web Title: Appeal for India Bandh