पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी आवाहन
By Admin | Updated: July 25, 2014 00:34 IST2014-07-24T23:44:48+5:302014-07-25T00:34:20+5:30
पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी आवाहन

पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी आवाहन
नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने चारचाकी वाहनांसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरू केली आहे. या मालिकेतील पसंतीचे क्रमांक राखून ठेवण्यात आले आहेत. ज्या वाहनधारकांना पसंतीचे क्रमांक हवे आहेत त्यांच्यासाठी येत्या ३० पासून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आवक विभागाच्या फलकावर लावण्यात आलेली आहे. आकर्षक क्रमांकासाठी ज्यांना अर्ज सादर करावयाचा आहे त्यांना नोंदणी शुल्काची रक्कम भरावी लागणार आहे. ज्यांना अर्ज सादर करावयाचा आहे त्यांनी दि. ३० रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.