अपंगाला मिळाला आधार

By Admin | Updated: June 5, 2016 23:59 IST2016-06-05T22:52:53+5:302016-06-05T23:59:40+5:30

आधारवड : दांपत्यास योजनेच्या माध्यमातून अनुदान

Apangala got the support | अपंगाला मिळाला आधार

अपंगाला मिळाला आधार

 बेलगाव कुऱ्हे : अपंगपणाचे ओझे घेऊन अनेक व्यक्ती जन्माला येतात. त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी शासन निरनिराळ्या योजना राबवित असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षापासून सुरू झालेली अपंग व्यक्तींसाठी तीन सेस विवाह अनुदान योजनेने अपंग व्यक्तींना प्रोत्साहन मिळत आहे.
अपंगाशी एखाद्या सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्याला जीवन जगण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत म्हणून निकडीचे आधार देण्यात येत आहेत.
इगतपुरी पंचायत समिती तीन सेस योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीसोबत सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास दांपत्यास योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.
आधारवड येथील एका पायाने अपंग असलेले नामदेव वाघमारे यांच्यासोबत सुदृढ मुलीने विवाह केला असल्याने या जोडप्याला पंचवीस हजार रु पयांचा धनादेश गटविकास अधिकारी किरण कोवे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य मुक्ताबाई गोवर्धने, शेतकरी पक्षाचे बाळासाहेब धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास गोवर्धने,
गुलाब गोवर्धने, भाऊसाहेब
सूर्यवंशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Apangala got the support