शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शहरात चीनविरोधात आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:28 IST

चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय सैन्यावर आक्रमक केल्याने त्यात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. चीनच्या कृत्याचा निषेध नोंदवत प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चीन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात येऊन पुतळा दहन करण्यात आला.

ठळक मुद्देपडसाद : तीव्र घोषणाबाजी; जोडामारोसह प्रतीकात्मक पुतळा दहन

पंचवटी : चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय सैन्यावर आक्रमक केल्याने त्यात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. चीनच्या कृत्याचा निषेध नोंदवत प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चीन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात येऊन पुतळा दहन करण्यात आला.नगरसेवक प्रियंका माने यांनी या निषेध कार्यक्रम आयोजन केले होते. यावेळी चीन बनावट मोबाइल फोन, टीव्ही स्क्रीन, चिनी बनावटीचे इलेक्ट्रिकल उपकरणांची तोडफोड करण्यात येऊन चिनी वस्तू जाळण्यात आल्या. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ असे म्हणत चीनविरोधी घोषणा दिल्या. याप्रसंगी चंद्रशेखर पंचाक्षरी, विलास कारेगावकर, धीरज बर्वे, रमेश बुरकुल, धनंजय माने, सोमनाथ बोडके, दगा पाटील, पंढरीनाथ चासकर, शोभा माने, कौस्तुभ पाटील, शोभा आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. शहरातील नाशिकरोड तसेच सिडको परिसरातही नागरिकांनी आंदोलने केली.संभाजी ब्रिगेडकडून पुतळ्याचे दहनसंभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेधार्थ चीनचा राष्ट्रध्वज व राष्ट्रध्यक्ष यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला. चीनच्या या कृत्याच्या निषेधार्थ शहरातील मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ संभाजी ब्रिगेडकडून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व चीनच्या राष्ट्राध्यक्ष व चीनच्या विरोधात घोषणाबाजी करून चीनचा झेंडा व राष्ट्राध्यक्षांचा पुतळा दहन करून व चिनी वस्तूंचा बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संभाजीब्रिगेडचे जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, अजय मराठे, विकी गायधनी, हिरामण नाना वाघ, नीलेश कुसमोडे, नितीन पवार, शंतनू चारहाटे, कृष्णा शिंदे, हर्षल पवार, सनी ठाकरे, गणेश सहाणे, विशाल धामोडे, राहुल तिडके, राहुल वाघ, विश्वदीप पंडित आदी उपस्थित होते.भाजयुमोची घोषणाबाजीभारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या निवडक कार्र्यकर्त्यांनी सीबीएस येथील हुतात्मा स्मारक येथे चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. सैनिकांवर हल्ला करणाऱ्या चीनचा धिक्कार असो, वंदे मातरम, चीनचा जाहीर निषेध, असे लिहिलेले फलक हातात धरून निषेध केला. यावेळी तीव्र घोषणा करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा शहर शहराध्यक्ष अ‍ॅड. अजिंक्य साने, मध्य मंडल भाजपा अध्यक्ष देवदत्त जोशी, युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमित घुगे, अमोल पाटील, हर्षद जाधव, पवन उगले आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकchinaचीनPoliticsराजकारण