उत्तरपत्रिका कचऱ्यात

By Admin | Updated: December 7, 2015 00:01 IST2015-12-07T00:00:30+5:302015-12-07T00:01:30+5:30

धक्कादायक के. के. वाघ अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजमधील प्रकार

In the answer sheets trash | उत्तरपत्रिका कचऱ्यात

उत्तरपत्रिका कचऱ्यात

नाशिक : विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यासाठी विद्यापीठाकडे न पाठविता कचऱ्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार के. के. वाघ अ‍ॅग्रीकल्चर, इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात समोर आला. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा पेपर कचऱ्यात आढळला तो विद्यार्थी परीक्षेस हजर असल्याचे दाखविल्याने हा संपूर्ण प्रकार संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीतर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या अ‍ॅग्रीकल्चरच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पार पडल्या. मात्र यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यासाठी विद्यापीठाकडे न पाठविता कचऱ्यात फेकून दिल्याचे काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला. मात्र प्रशासनाने समाधानकारक उत्तर न देता, त्यांच्याकडून पेपर मिळविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्या विद्यार्थ्यांना दमदाटीदेखील केली. परंतु विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला भीक न घालता हा संपूर्ण प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले आहे. यासाठी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती हस्तगत करण्यासाठी विद्यापीठाकडे माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल केला आहे.

Web Title: In the answer sheets trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.