मनपा कर्मचारी खुनातील दुसरा संशयित ताब्यात

By Admin | Updated: June 4, 2017 02:56 IST2017-06-04T02:56:04+5:302017-06-04T02:56:14+5:30

पंचवटी : मखमलाबाद नाक्यावर राहणारा मनपा सफाई कामगार अरुण अशोक बर्वे यांच्या खुनाचे गूढ उकलण्यास पंचवटी पोलिसांना यश आले

Another suspect in the possession of the employee was killed | मनपा कर्मचारी खुनातील दुसरा संशयित ताब्यात

मनपा कर्मचारी खुनातील दुसरा संशयित ताब्यात

 लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : मखमलाबाद नाक्यावर राहणारा मनपा सफाई कामगार अरुण अशोक बर्वे यांच्या खुनाचे गूढ उकलण्यास पंचवटी पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी या खूनप्रकरणी रामवाडीतील फरार सराईत गुन्हेगार वैभव ऊर्फ विकी दत्तात्रय काळे या दुसऱ्या संशयितास ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मयत मनपा कामगार बर्वे याचा खून लुटमारीसाठीच केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे़ बुधवारी (दि. ३१) अज्ञात मारेकऱ्यांनी बर्वे याचा खून करून मृतदेह कोशिरे मळ्यासमोरील गोदावरी नदीपात्रात फेकून दिला होता. नदीपात्रात मृतदेह असल्याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मयताच्या पाठीवर, डोक्यावर काहीतरी शस्त्राने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या होत्या, तर ज्या ठिकाणी मृतदेह मिळाला तेथून काही अंतरावर रक्ताचे डाग, अर्धवट जळालेला चष्मा मिळाला होता.
बुधवारी (दि़३१) पहाटेच्या सुमाराला मयत बर्वे रामवाडीतील पुलावरून आपल्या दुचाकीवरून जात असताना संशयित आरोपी कृष्णा चांदवडकर व सराईत गुन्हेगार वैभव काळे या दोघांनी बर्वे यांना शस्त्राचा धाक दाखवून अडविले.

Web Title: Another suspect in the possession of the employee was killed