स्वाइन फ्लूचा आणखी एक रुग्ण

By Admin | Updated: March 21, 2017 00:20 IST2017-03-21T00:19:31+5:302017-03-21T00:20:00+5:30

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये आणखी एक संशयित रुग्ण दाखल झाला असून, या कक्षातील रुग्णांची संख्या चार झाली आहे़

Another sufferer of swine flu | स्वाइन फ्लूचा आणखी एक रुग्ण

स्वाइन फ्लूचा आणखी एक रुग्ण

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये आणखी एक संशयित रुग्ण दाखल झाला असून, या कक्षातील रुग्णांची संख्या चार झाली आहे़ दरम्यान, यातील तिघांचे तपासणी अहवाल अद्याप रुग्णालयास प्राप्त झालेले नाहीत़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात रविवार (दि़१९) पर्यंत दोन महिला व एक पुरुष असे तीन स्वाइन फ्लू संशयित रुग्ण दाखल होते़ त्यामध्ये कळवण येथील गर्भवती महिला, नांदगाव येथील महिला व इंदिरानगरमधील एका इसमाचा समावेश होता़ यामध्ये रविवारी रात्री उशिरा पंचवटी येथील रामवाडीतील एका पुरुषास या कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़
दरम्यान, स्वाइन फ्लू कक्षात दाखल असलेल्या रुग्णांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़ टॉमीफ्लूच्या गोळ्यांचा साठा पुरेशा प्रमाणात असून, जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही पुरवठा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Another sufferer of swine flu