गोल्डन विंग्ज स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:21 IST2020-02-21T23:36:28+5:302020-02-22T01:21:25+5:30
सोशल मीडियाच्या जाळ्यात मॉडेल आईसह नवी पिढी इतकी अडकली आहे की, आईच्या पदराची नात्यांची वीण विस्कटली असल्यामुळे जगण्याचे ताल हरविले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाइलच्या युगातून बाहेर काढा, असे आवाहन कवी विष्णू थोरे यांनी केले.

गोल्डन स्कूलच्या वार्षिक बक्षीस वितरणप्रसंगी विष्णू थोरे, केशव बनकर, सतीश मोरे, राहुल गवारे, विजय गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, प्रज्ञा पटाईत आदी.
पिंपळगाव बसवंत : सोशल मीडियाच्या जाळ्यात मॉडेल आईसह नवी पिढी इतकी अडकली आहे की, आईच्या पदराची नात्यांची वीण विस्कटली असल्यामुळे जगण्याचे ताल हरविले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाइलच्या युगातून बाहेर काढा, असे आवाहन कवी विष्णू थोरे यांनी केले.
पिंपळगाव बसवंत येथील इंदूप्रभा गांगुर्डे सामाजिक शिक्षण संस्था संचलित गोल्डन विंग्ज इंग्लिश मीडिअम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर बसवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश मोरे, उद्योजक व जेसीआयचे सदस्य केशव बनकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय गांगुर्डे, संस्थेचे संस्थापक सचिव संतोष गांगुर्डे, प्रशांत घोडके, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन गांगुर्डे, राहुल गवारे, सी. पी. उशिरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य प्रज्ञा पटाईत यांनी केले. मान्यवरांचे स्वागत संतोष गांगुर्डे यांनी केले. सी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. शिंदे, पी. ए. गांगुर्डे, कैकाशा शेख, रमेश गांगुर्डे, विनीत बागुल आदींनी परिश्रम घेतले.