बारागावपिंप्री महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:14 IST2020-01-29T22:35:55+5:302020-01-30T00:14:11+5:30
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड संचलित बारागावपिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

बारागावपिंप्री महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव उत्साहात
बारागावपिंप्री महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणपतराव मुठाळ, डॉ. एन. एस. उमराणी, डी. एल. फरताळे, प्रवीण जोशी, मिलिंद पांडे, मंगल सांगळे, सुजाता डावखर, मंजुश्री उगले, ललित गांगुर्डे, गोरक्षनाथ पगार आदी.
सिन्नर : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड संचलित बारागावपिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी उपस्थित होते. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असल्यास विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्तीने विचार करण्याची क्षमता, नावीन्यपूर्ण विश्लेषण करण्याची क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारी हातोटी ही क्षमता कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर धाडस, संयम, शहाणपण आणि न्यायबुद्धी हे गुण शिक्षणातून विकसित होणे महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश मिळविणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले. अनेक दाखले देत त्यांनी आपले विचार मांडले. डी. एल. फरताळे यांनी डॉ. एन. एस. उमराणी यांचे स्वागत केले. खेड्याकडे चला हे आमच्या महाविद्यालयाचे मुख्य ध्येय असल्याचे फरताळे यांनी मनोगतातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणगौरव व मंगल सांगळे यांनी केले. मंजुश्री उगले यांनी क्रीडा अहवालाचे, तर रेखा नन्नावरे यांनी सांस्कृतिक अहवालाचे वाचन केले. स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण जोशी, मिलिंद पांडे यांच्यासह मान्यवर तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता डावखर, ललित गांगुर्डे यांनी केले. आभार गोरक्षनाथ पगार यांनी मानले.