पांजरापोळ संस्थेची वार्षिक सभा

By Admin | Updated: March 6, 2017 00:24 IST2017-03-06T00:24:26+5:302017-03-06T00:24:36+5:30

मालेगाव : येथील श्री गोशाळा पांजरापोळ या गोरक्षण गोपालन करणाऱ्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण व तहकूब सर्वसाधारण सभा श्री अग्रेसन भवन वर्धमाननगर येथे झाली

Annual meeting of Panjrapol Institute | पांजरापोळ संस्थेची वार्षिक सभा

पांजरापोळ संस्थेची वार्षिक सभा

मालेगाव : येथील श्री गोशाळा पांजरापोळ या गोरक्षण गोपालन करणाऱ्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण व तहकूब सर्वसाधारण सभा श्री अग्रेसन भवन वर्धमाननगर येथे झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थेचे सरचिटणीस रमेश ओस्तवाल यांची निवड झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष केशरीचंद मेहता होते. प्रारंभी अग्रेसन महाराज व गोमातेच्या प्रतिमेचे पूजन मेहता, हरीलाल अस्मर, मोहनलाल सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष मोहनलाल सराफ यांनी मार्गदर्शन केले. नवीन विश्वस्त येईपर्यंत संस्थेचा कारभार संस्थेचे जनरल सेक्रेटरी रमेशचंद्र ओस्तवाल यांना देण्यात यावा, अशा सूचनेस मंजुरी देण्यात आली. प्रारंभी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष केशरीचंद मेहता, विश्वस्त विजय मेहता, ब्रिजकिशोर बाहेती यांचा राजीनामा मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे वाचून दाखविण्यात आला.
संस्थेचे कोषाध्यक्ष रघुवीरजी पाटोदिया यांनी वार्षिक ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे मांडले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
सर्वसाधारण सभेस तुळशीराम पाटोदिया, सोहनलाल जैन, शंकरराव आहिरे, प्रल्हाद शर्मा, मोहनलाल सराफ, सज्जनकुमार टिबडेवाल, महेश पाटोदिया, रमेश ओस्तवाल, रघुवीर पाटोदिया, देवकिसन बडाळे, प्रकाश सुराणा, हरिप्रसाद गुप्ता, संदीप भुसे, प्रेमराज जाखोट्या, शामसुंदर लखोटिया, रामरतन काबरा, उत्तमराव वनाजी पाटील, नटवर दायमा, अजयकांत मंडावेवाला, विनय राहुडे, जवाहर नानावटी, प्रकाश शाह, रामदेव शास्त्री, सचिन शाह आदि उपस्थित होते.

Web Title: Annual meeting of Panjrapol Institute