बागलाण पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 20:47 IST2019-07-23T20:44:55+5:302019-07-23T20:47:41+5:30
सटाणा : येथील लाडशाखिय वाणी मंगलकार्यालयात बागलाण तालुका पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बधान होते.

सटाणा येथील लाडशाखिय वाणी समाज मंगल कार्यालयात पार पडलेल्या बागलाण तालुका पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभेला दिपप्रज्वलनने प्रारंभ करतांना गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, अध्यक्ष प्रकाश बधान ,बाजीराव पाटील मोठाभाऊ बच्छाव आदी.
सटाणा : येथील लाडशाखिय वाणी मंगलकार्यालयात बागलाण तालुका पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बधान होते.
सभेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हापरिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ए. पी. पगार उपस्थित होते.
सभेत २००६ ते २००९ पर्यंत सेवानिवृत्त झालेले व २०१६ ते २०१८ पर्यंत सेवानिवत्त झालेल्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग प्रमाणे पेन्शन लागू करणे, मागील थकबाकी रोख देणे, ज्यांना सेवानिवृत्त होऊन पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पुर्ण पेन्शन मिळत नाही यावर उपाययोजना करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
असोसिएशनचे सरचिटणीस बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविकात पेन्शनरांचे सर्व प्रश्न लेखी स्वरूपात द्यावेत त्यासाठी पाठपुरावा करु न प्रश्न निकाली काढण्यास भाग पाडू असे स्पष्ट केले.
सेवानिवृत्त शिक्षकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांचे आजारपण, कुटुंबाच्या अडचणी समजून त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळवुन देण्याचे प्रमाणिक काम केले जात असल्याचे गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी सांगितले. उतारवयात सुध्दा पंचायत समिती किंवा वेळ प्रसंगी जिल्हापरिषद कार्यालयात जाऊन पेन्शनरच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरुच राहील असे बधान यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. यावेळी जिल्हापरिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांनी भार्गदर्शन केले.