सालाना जोडमेला सोहळा उत्साहात
By Admin | Updated: December 26, 2016 02:13 IST2016-12-26T02:13:22+5:302016-12-26T02:13:42+5:30
मनमाड : गुरुद्वारात गुरुगादी स्मृतिदिन

सालाना जोडमेला सोहळा उत्साहात
मनमाड: येथील शिख धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या गुरुद्वारात आज सालाना जोडमेला आणि श्री गुरुगादी स्मृतिदिन वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाभरातील शिख बांधवांनी गुरुद्वारामध्ये हजेरी लावून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
संत बाबा नरेंद्रसिंघजी (कारसेवावाले) वसंत बाबा बलबिंदरसिंघजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाले. मनमाड शहर व परिसरातील सर्वधर्मीय बांधवानी या वेळी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.उपस्थीत भक्तांचे स्वागत गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंगजी यांनी केले.
सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुक एकात्मता चौकात येताच नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, सुनिल पाटील, प्रमोद पाचोरकर,साईनाथ गिडगे यांनी संत महंताचे स्वागत केले.विविध पथकांनी दांडपट्टा, तलवारबाजी आदी चित्तथरारक प्रात्यक्षीतांचे सादरीकरण केले.(वार्ताहर)