माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी आपलं पॅनल जाहीर

By Admin | Updated: June 17, 2015 01:48 IST2015-06-17T01:44:24+5:302015-06-17T01:48:31+5:30

माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी आपलं पॅनल जाहीर

Announcing Our Panel for Secondary Teacher Credit Society | माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी आपलं पॅनल जाहीर

माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी आपलं पॅनल जाहीर

नाशिक : जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एन.डी.एस.टी.बचाव कृती समिती व शिक्षक विकास आघाडीच्या वतीने समर्थ मंगल कार्यालयात शिक्षक सेवक मेळावा झाला. या मेळाव्यात माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एन.डी.एस.टी. बचाव कृती समितीच्या वतीने ‘आपलं पॅनल’ जाहीर करण्यात आले. आपलं पॅनलच्या वतीने आघाडीचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे व समन्वयक पुरुषोत्तम रकिबे यांनी उमेदवार जाहीर केले. सध्याच्या संचालक व अध्यक्षांनी संगणक खरेदी, कर्मचारी भरती, प्रवास बिले, शाखा विस्तार, वातानुकूलित यंत्रणा, फर्निचर खरेदी, जाहीरातबाजी, अवास्तव पगार बिले, अशा अनेक मार्गांनी आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप प्रकाश सोनवणे यांनी मेळाव्यात केला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बी. एन. निकम, तर प्रमुख पाहुणे म्हणून बी. एन. पवार, हिरालाल परदेशी, प्रकाश पगारे, संजय पवार, मनोज वाघ, रमेश निकम, प्र. दा. पगार, राजेंद्र जाधव आदि उपस्थित होते. मेळावा उपस्थितेसाठी हिरामण शिंदे, महेश अहिरे, सखाराम जाधव, वासुदेव बधान, उमेश मोरे, किरण शिंदे, गणेश टर्ले, तुकाराम घुले, अनिल परदेशी आदिंनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Announcing Our Panel for Secondary Teacher Credit Society