महापौर निवडीचा कार्यक्रम लवकरच होणार जाहीर

By Admin | Updated: August 31, 2014 00:54 IST2014-08-31T00:13:38+5:302014-08-31T00:54:50+5:30

नगरसचिवांचा प्रस्ताव : विभागीय आयुक्तांकडे केली मागणी

The announcement of Mayor's choice will soon be announced | महापौर निवडीचा कार्यक्रम लवकरच होणार जाहीर

महापौर निवडीचा कार्यक्रम लवकरच होणार जाहीर

नाशिक : वेळेपेक्षा जास्त उशीर नको यासाठी आरक्षणाच्या अधिकृत राजपत्राची वाट न पाहता नगरसचिवांनी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविला असून, त्या आधारे पुढील आठवड्यात महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान महापौरांचा कार्यकाल संपण्यासाठी केवळ दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक राहिला असताना लवकरच महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणे गरजेचे होते. त्यातच मंत्रालयात महापौरपदाची सोडत काढण्यात आल्यानंतर त्याबाबत अधिकृत राजपत्र आल्यानंतर त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता होती. परंतु अद्यापही त्याबाबत अधिकृत राजपत्र पालिकेला प्राप्तच झाले नव्हते.

Web Title: The announcement of Mayor's choice will soon be announced