जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST2021-07-31T04:16:36+5:302021-07-31T04:16:36+5:30

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी महसूलदिनी जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. यंदा जिल्ह्यातील १३ ...

Announcement of the best officers and employees in the district | जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांची घोषणा

जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांची घोषणा

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी महसूलदिनी जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. यंदा जिल्ह्यातील १३ अधिकारी, कर्मचारी यांची उत्कृष्ट कार्याबद्दल निवड करण्यात आली आहे. येत्या २ तारखेला महसूलदिनी त्यांना पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि शासनाबद्दल सकारात्मक भूमिका निर्माण व्हावी यासाठी कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूलदिनी गौरविले जाते. यंदा महसूल विभागातील १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

उपजिल्हाधिकारी नीलेश श्रिंगी, तहसीलदार प्रशांत पाटील, जितेंद्र इंगळे, नायब तहसीलदार पोपट सोनवणे, अव्वल कारकून मीनल धारणकर, मंडल अधिकारी श्याम बोरसे, लिपिक सूर्यकांत भोसले, तलाठी अश्विनी शेंडे, पोलीसपाटील सुमित्रा थेल, कोतवाल मोहन कर्वे, वाहनचालक मंगेश लोंढे, शिपाई अनिल वैद्य आणि लघुलेखक विशाल पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

Web Title: Announcement of the best officers and employees in the district