शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

साने गुरुजी शिक्षण मंडळाचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:36 IST

धर्मदाय संस्था व चॅरिटीसाठी झटणारे अनेक आहेत. मात्र संस्था चालवणे हे एक समूहाचे काम असून, साने गुरुजी शिक्षण संस्थेचा वसा आणि वारसा सर्वांनी यापुढे असाच चालवावा, असे प्रतिपादन इंडस्ट्री आणि लेबर कोर्टाचे अध्यक्ष न्यायमूर्ती शशिकांत सावळे यांनी केले.

नाशिकरोड : धर्मदाय संस्था व चॅरिटीसाठी झटणारे अनेक आहेत. मात्र संस्था चालवणे हे एक समूहाचे काम असून, साने गुरुजी शिक्षण संस्थेचा वसा आणि वारसा सर्वांनी यापुढे असाच चालवावा, असे प्रतिपादन इंडस्ट्री आणि लेबर कोर्टाचे अध्यक्ष न्यायमूर्ती शशिकांत सावळे यांनी केले.  साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा ५६ व वर्धापनदिन के. जे. मेहता शाळेच्या शोभेंदू सभागृहात शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती शशिकांत सावळे बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ, सेक्रेटरी प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे, विश्वस्त अनिल अरिंगळे, डॉ. भूषण कानवडे, संस्थेच्या शिक्षणाधिकारी मंगला कानवडे, मुंबई महाविद्यालयाचे अशोक गवारे, आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळीे साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या संस्थापकांनी लावलेल्या रोपट्याचा हा वटवृक्ष सांभाळताना अभिमान वाटतो आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रवीण जोशी यांनी केले. तर अध्यक्ष पदावरून गणपतराव मुठाळ यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये देणगीदार, शिक्षक व विद्यार्थी यांचा मोठा हातभार असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेत वर्षभर राबवलेल्या उपक्र मात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  प्रास्ताविक प्राचार्य अशोक अरिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी दापोरकर व आभार एस. एस. शिंदे यांनी मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा