Anniversary of Mahatma Phule at Devgaon | देवगांव येथे महात्मा फुले यांची जयंती

देवगावी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन प्रसंगी सरपंच राजू कौले, ग्रामविकास अधिकारी किसन राठोड व पोपट रोकडे.

ठळक मुद्देप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन

देवगांव : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची जयंती देवगांव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच राजू कौले यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक अंतर ठेवून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोहिते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे, ग्रामविकास अधिकारी किसन राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी पोपट रोकडे, आदी उपस्थित होते.
 

Web Title: Anniversary of Mahatma Phule at Devgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.