महाराष्ट्र समाज सेवा संघाचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:16 IST2021-09-27T04:16:07+5:302021-09-27T04:16:07+5:30

संस्थेचे अध्यक्ष धामणे, उपाध्यक्ष डोंगरे, सचिव साळी, सहसचिव अहिरे, कोषाध्यक्ष ओक या सर्व ...

Anniversary of Maharashtra Social Service Association | महाराष्ट्र समाज सेवा संघाचा वर्धापन दिन

महाराष्ट्र समाज सेवा संघाचा वर्धापन दिन

संस्थेचे अध्यक्ष धामणे, उपाध्यक्ष डोंगरे, सचिव साळी, सहसचिव अहिरे, कोषाध्यक्ष ओक या सर्व पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी दीपप्रज्वलन व प्रास्ताविक केले. नंतर अर्चना कोठावदे यांनी संस्थेची माहिती सांगितली. किसन महाले यांनी श्रमदानाची संकल्पना समजावून दिली. नंतर सर्वांनी आपापल्या वर्गाची व परिसराचे स्वच्छता करून श्रमदान केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी दोन-दोन रोपे लावत संस्थेप्रमाणेच याची जोपासना करून या परिसराला त्याचा उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करू, असा संकल्प केला. सर्व शिक्षकांनी मैदानावर श्रमदान केले. बबन चव्हाण यांनी आभार मानले. (फोटो २६ माई लेले)

Web Title: Anniversary of Maharashtra Social Service Association