अण्णा भाऊ साठे यांना नाशिकरोड येथे अभिवादन
By Admin | Updated: August 1, 2015 23:04 IST2015-08-01T22:58:21+5:302015-08-01T23:04:31+5:30
अण्णा भाऊ साठे यांना नाशिकरोड येथे अभिवादन

अण्णा भाऊ साठे यांना नाशिकरोड येथे अभिवादन
नाशिकरोड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध संस्था, संघटना यांच्या
वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण
करून आदरांजली वाहण्यात
आली.
नाशिक येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त जय लहुजी सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आर. पी. तांबे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संजय गालफाडे, भारत जाधव, गोपाळ बस्ते, विश्वास कांबळे, अशोक साठे, चंद्रकांत आल्हाट, प्रमोद शिरसाठ, कैलास गायकवाड, वसंत थोरात, बाबा अस्वले, नंदा गोरे, जनाबाई डांगळे आदि उपस्थित होते.
मातंग जागृती अभियान
मातंग जागृती अभियान यांच्या वतीने विहितगाव येथील माउली हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन मातंग जागृती अभियानचे प्रमुख रवींद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, उत्तमराव कोठुळे, साहेबराव शृंगार, विक्रम कोठुळे, संतोष बागुल आदि उपस्थित होते.
यावेळी नाना खंडाळे, अशोक जाधव, सुभाष मोरे, अमोल आल्हाट, संदीप कांबळे, हरिदास जाधव, नितीन चव्हाण, राजेंद्र आहिरे, विजय गायकवाड, अशोक पगारे, कैलास गायकवाड, भारत चव्हाण, भूषण मोरे, वाल्मीक लोंढे, किरण पगारे, सुमित भालेराव, नितीन गुणवंत, संतोष गांगुर्डे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)