अनिंदो चटर्जींच्या तबलावादनाची मैफल

By Admin | Updated: December 12, 2015 23:20 IST2015-12-12T23:19:25+5:302015-12-12T23:20:05+5:30

पवार पुण्यतिथी : तायडे यांचे गायन रंगणार

Anindo Chatterjee's tabla concert | अनिंदो चटर्जींच्या तबलावादनाची मैफल

अनिंदो चटर्जींच्या तबलावादनाची मैफल

नाशिक : पवार तबला अकादमीच्या वतीने पं. भानुदास पवार स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या बुधवारी (दि.१६) हा सुरेल कार्यक्रम रंगणार आहे. यानिमित्त नाशिककरांना कोलकाता येथील जागतिक कीर्तीचे वादक पं. अनिंदो चटर्जी यांच्या तबलावादनाची पर्वणी लाभणार असून, येथील गायक अविराज तायडे यांची गायनाची मैफलही रंगणार आहे.
महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. या समारोहाचे यंदाचे अठरावे वर्ष आहे. पं. अनिंदो चटर्जी हे फरुखाबाद घराण्याची परंपरा समर्थपणे चालवत आहेत. या कार्यक्रमात पं. चटर्जी यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र व युवा तबलावादक अनुब्रत चटर्जी सहवादन करणार आहेत.
फारुख लतिफ (सारंगी), प्रशांत महाबळ (संवादिनी) संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी गायक अविराज तायडे यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना नितीन पवार (तबला), सुभाष दसककर (संवादिनी) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाला सर्वांना खुला प्रवेश आहे.

Web Title: Anindo Chatterjee's tabla concert