कचराकुंड्यांभोवती जनावरांचा वावर
By Admin | Updated: August 20, 2014 00:40 IST2014-08-19T23:05:21+5:302014-08-20T00:40:11+5:30
कचराकुंड्यांभोवती जनावरांचा वावर

कचराकुंड्यांभोवती जनावरांचा वावर
मनमाड शहरातील अनेक भागात कचराकुंड्या वेळेवर साफ केल्या जात नसल्याने या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. अनेकवेळा कचराकुंड्या ओसंडून वाहात असल्याने या ठिकाणी जनावरे मनसोक्त ताव मारतानाचे चित्र पहावयास मिळते. रिमझिम पावसामुळे तर हा कचरा सडून दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांना नाकावर रूमाल लावून मार्गक्रमण करावे लागते. सावरकरनगर हुडको भागातील कचाराकुंड्यांमधील गच्च भरलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही कुंड्या साफ केल्या जात नसल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. कचराकुंड्यांमधील कचरा तत्काळ उचलण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.