अपघातग्रस्त वाहनातून जनावरांचे मांस जप्त

By Admin | Updated: November 2, 2015 22:34 IST2015-11-02T22:33:35+5:302015-11-02T22:34:14+5:30

ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

Animal meat seized from an accidental vehicle | अपघातग्रस्त वाहनातून जनावरांचे मांस जप्त

अपघातग्रस्त वाहनातून जनावरांचे मांस जप्त

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास डंपरला धडक देणाऱ्या ट्रकमध्ये जनावरांचे मांस आढळून आले असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात अपघात व प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अमृतधाम चौफुलीवर ट्रकचालकाने (एमएच-४१ जी ७०३४) भरधाव वाहन चालवून समोरून येणाऱ्या डंपरला (एमएच-४१ जी ७२६६) जोरदार धडक दिली. यामध्ये डंपरचालकासह क्लिनर गंभीर जखमी झाला, तर अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता़.
या अपघातप्रकरणी डंपरचालक नामदेव बहिरम (४५, रा जाखूड, ता. बागलाण, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता, त्यात जनावरांचे मांस आढळून आल्याने पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात प्राणी संरक्षण कायद्यान्वयेही गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Animal meat seized from an accidental vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.