पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांची होणार झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:41 AM2018-10-23T01:41:12+5:302018-10-23T01:41:58+5:30

: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्णात सुरू असलेल्या कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे आढावा घेणार असून, कामकाज असमाधानकारक असलेल्या कर्मचाºयांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.

 Animal Husbandry Officers Will Flour | पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांची होणार झाडाझडती

पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांची होणार झाडाझडती

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्णात सुरू असलेल्या कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे आढावा घेणार असून, कामकाज असमाधानकारक असलेल्या कर्मचाºयांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अधिकाºयांमध्ये आताच चिंता व्यक्त केली जात असून, बैठकीच्या तयारीसाठी अधिकारी कामाला लागले असल्याचे समजते.  या आढावा बैठकीत जिल्हा परिषद अंतर्गत तालुका व ग्राम स्तरावर कार्यरत पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक या सर्वांचा कामाच्या मूल्यमापन अहवालानुसार आढावा घेण्यात येणार आहे. ज्या अधिकारी व कर्मचाºयांच्या कामात मागील सहा महिन्यांत कोणतीही प्रगती झाली नाही तसेच चालू वर्षाच्या तसेच मागील वर्षाच्या कामाची तुलना करून ज्यांचे काम अतिशय असमाधानकारक असेल त्यांना कामकाजाबाबत विचारणा करण्यात येणार आहे.
लक्षांकानुसार घेणार आढावा
पशुधन दवाखान्यांचे तांत्रिक कामकाज, लसीकरण, कृत्रिम रेतन, संकरित पैदास, पशुधनास आधार ओळख बिल्ले लावणे, पशुगणना याबाबत शासनाने दिलेल्या लक्षांकानुसार आढावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्णातील प्रत्येक पशुपालकास पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसेवेचा लाभ देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असून, यासाठी सदरची आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्जे यांनी दिली.

Web Title:  Animal Husbandry Officers Will Flour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.